Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गावर मानकोली फ्लायओवर लवकरच होणार सुरू

Share

नाशिक : नाशिकहून मुंबई येजा करणाऱ्या सर्व प्रवाशांना शुभवार्ता असून लवकरच राजनोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-नाशिक यानंतर कमी होणार असून यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

दरम्यान नुकताच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) घेतलेल्या या उड्डाणपुलाचे काम निम्मे झाले असून लवकरच हा वाहतुकीला उपलब्ध होणार आहे. यामुळे कल्याण-भिवंडी येथील स्थानकावर न थांबता आपला वेळ वाचविता येणार आहे.

एमएमआरडीएने ३ ते ४ जुलै दरम्यान गर्डर टाकण्याचे काम केले असून ६५० मीटर आणि चार पदरी असलेल्या या उडाणपूलाचे उजव्या बाजूचे काम संपताच वाहनधारकां दिलासा मिळणार आहे. यामुळे वाहतुकीला चालना मिळणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. तसेच वाहनधारकांचे इंधन बचत होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!