Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

महाराष्ट्राचा निर्णय नाही पण हरियाणाच्या मुख्यमंत्री पदी मनोहरलाल खट्टर

Share

मुंबई : महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून सत्ता स्थापनेची खलबते राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत. तर हरियाणामध्ये भाजप जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करणार आहे.

भाजपाचे मनोहरलाल खट्टर हे पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असून, आज (रविवारी) दुपारी सव्वा दोनच्या वाजता हरियाणामधील मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ एकमताने त्यांच्या नावाला पंसती देण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची घोषणा केली.

दरम्यान हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांना जजपाने पाठिंबा दिला आहे. भाजपाचे ४०, जेजेपीचे १० आणि ७ अपक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. आज (रविवारी) मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जननायक जनता पार्टी युती सरकारचा शपथविधी होणार आहे.

तसेच हरियाणाबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. एकीकडे हरियाणाचे सत्ता स्थापन होत असतांना महाराष्ट्रात अद्याप निर्णय झाला नसून महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार येणार कि यावेळी शिवसेनेला संधी मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी फिफ्टी फिफ्टी फॉर्मुला सांगितलं असून भाजपकडून अजून निर्णय नसल्याचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!