Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

सत्ता स्थापनेचा पेच सुप्रीम कोर्टात; उद्या पुन्हा सुनावणी होणार

Share

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना कोर्टाने नोटीस दिली असून सर्व पक्षकारांना देखील नोटीस बजावली आहे. तसेच आजची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

राज्यात शनिवारी झालेल्या हायहोल्टेज राजकीय नाट्यानंतर आता सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कपिल सिब्बल महाविकास आघाडीच्यावतीने युक्तिवाद करत होते. तर भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी बाजू मांडत होते.

या सुनावणीदरण्यां सुप्रीम कोर्टाने सांगितले कि, उद्या राज्यपालांची सर्व कागदपत्रे सकाळी १०. ३० वाजता या संदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्यात यावी असे आदेश कोर्टाने तुषार मेहता यांना दिले आहेत.

तसेच अजित पवारांनी राज्यपालांकडे सादर केलेल सर्व कागदपत्र सादर करावे असे हि सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सत्ता पेचाबाबत सुनावणी होणार आहे. यामुळे भाजपला कुठेतरी दिलासा मिळाल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!