Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

#MumbaiRains : महालक्ष्मी एक्सप्रेसमधून पाचशेच्यावर लोकांना बाहेर काढण्यात यश; मदतीसाठी एअर फोर्ससह नौदलही घटनास्थळी

Share

ठाणे : महालक्ष्मी एक्सप्रेमध्ये अडकलेल्या २ हजार प्रवाशांपैकी ५५० प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून या ठिकाणी अन्न व औषधे पपुरविण्यात आली आहेत. तर दुसरीकडे कल्याण मुरबाड परिसरात पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी १५० लोक पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत.

तसेच कल्याण मुरबाड परिसरातही पावसाने हाहाकार उडविला असून मुरबाड स्थित कंबा गाव आणि बिर्ला मंदिर परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. दरम्यान या ठिकणी एनएसए ची टीम पोहचली असून बचावकार्य चालू आहे. या पुराच्या पाण्यात १५० नागरिक अडकले असून अद्यापपर्यंत ५० नागरिकांना विनतया विन होम या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. या नागरिकांना औषधे व अन्न पुरवठा करण्यात आला आहे.

*#MumbaiRains : महालक्ष्मी एक्सप्रेसमधून पाचशे लोकांना बाहेर काढण्यात यश

*#MumbaiRains : महालक्ष्मी एक्सप्रेसमधून पाचशे लोकांना बाहेर काढण्यात यश; मदतीसाठी एअर फोर्ससह नौदलही घटनास्थळी.#MumbaiRains #MumbaiRainlive #MumbaiRainsLiveUpdates #MahalaxmiExpress #Badlapur

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, २७ जुलै, २०१९

दरम्यान पाऊस सुरु असल्याने पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामउळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे बचावपथकाने सांगितले. तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश येत असून अद्यापपर्यंत ५५० प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या ठिकाणी औषधे व अन्नपुरवठा करण्यात येत आहे.

 

महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेल्या ठिकाणाहून ५५० नागरिकांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तसेच ठाण्याचे महानगरपालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी बदलापूर घटनास्थळावर आपत्ती व्यवस्थापक पथकास पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये २० प्रशिक्षित जवान एका द्रुत प्रतिसाद वाहना सोबत एनडीआरएफच्या जवानांना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहचले आहे. तसेच दोन एअर फोर्स हेलिकॉप्टर घटनस्थळावर लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!