Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

देशभरातील एक्सिट पोलनुसार देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’

Share

मुंबई : नुकत्याच लोकसभा २०१९च्या निवडणूकांचे मतदान झाले. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर केंद्रात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २३ मे रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो.

दरम्यान विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविलेल्या एक्सिट पोल नुसार अंदाज व्यक्त केला आहे, यामध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जवळपास सर्वच संस्थांनी एनडीएला स्पष्ट बहुमत किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असं दाखवलं आहे. 2014 मध्ये मात्र एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या आणि एनडीएला 336 जागा मिळल्या होत्या. पण यंदा मात्र एकाही सर्वेत एनडीएला 330 च्या आसपास किंवा तेवढ्या जागा दाखवल्या जात नाहीयेत. परिणामी भाजपच्या जागा यंदा कमी होण्याचा अंदाज यातून दिसून येत आहे.

न्यूज एक्स आणि एबीपीनं त्यांच्या वर्तविलेल्या अंदाजानुसार एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं भाकित वर्तवलं आहे. न्यूज एक्सनं एनडीएला २४२ जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एबीपी या वृत्तवाहिनीने एक्सिट पोलनुसार एनडीएला २६७ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन्ही वृत्तवाहिन्यांच्या सर्वेनुसार एनडीएला सत्ता स्थापनेसाठी १५ ते ३० जागा कमी पडू शकतात.

टाइम्स नाऊ एक्झिट पोल

एनडीए – ३०६
यूपीए – १३२
इतर – १०४

एबीपी माझा- नेल्सन एक्झिट पोल
एनडीए – २६७
यूपीए – १२७
सपा -बसपा – ५६
इतर – ८४

एबीपी माझा- नेल्सन एक्झिट पोल
महाराष्ट्र एकूण जागा – ४८

राष्ट्रवादी काँग्रेस – ९

राष्ट्रीय काँग्रेस – ०४

शिवसेना – १७

भाजप – १७

वंचित बहुजन आघाडी – ००

इतर – १

टीव्ही ९ आणि सी व्होटर चा एक्झिट पोल
महाराष्ट्र एकूण जागा – ४८

राष्ट्रवादी काँग्रेस – ०६

राष्ट्रीय काँग्रेस – ०८

शिवसेना – १५

भाजप – १९

वंचित बहुजन आघाडी – ००

इतर – ०

आघाडी – एकूण जागा: १४

युती – एकूण जागा: ३४

केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही एनडीए सरकारचा येणार असल्याचा वरील एक्सिट पोल नुसार अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!