Type to search

आता निवडणूक प्रचारातही ढोल ताशांचा वापर…

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

आता निवडणूक प्रचारातही ढोल ताशांचा वापर…

Share

मुंबई : निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवार ढोलताश्यात विजयी मिरवणुका काढतात. आता मात्र निवडणुकीच्या प्रचारातही ढोल-ताशांचा वापर उमेदवारांकडून होताना दिसत आहे.

उमेदवारांना प्रचार आणि शक्तिप्रदर्शनासाठी ढोल-ताशांचे पथक प्रभावीपणे भूमिका पार पाडत असल्याचे दिसत आहे. एरवी मराठी सणासुदीला किंवा गणेशोत्सवात ढोल-ताशांचा गजर ऐकायला मिळतो. पण आता लोकशाहीच्या उत्सवातही या कला पथकांना आमंत्रण मिळत आहे. यातून तरुणांना रोजगार मिळत आहे. उमेदवाराच्या प्रचारफेरीत या ढोल-ताशा पथकांचा पेहराव अनोखा असतो. प्रचार फेरीत किती तास ढोल वाजवायचा यावर पथकाची सुपारी ठरते.

एका दिवसात साधारण ५० हजार ते १ लाखांपर्यंतच मानधन ढोल ताशा पथकाला मिळते. यात पथकाचा विशेष पेहराव, पथकासोबतचा ध्वज याचा देखील समावेश असतो. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकीच्या आखाड्यात ढोल ताशा पथकात सहभागी झाले आहेत. रोजगार मिळत असल्याने युवा वर्गही आनंदीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!