Type to search

लोकसभा रणसंग्राम : तिस-या टप्यात सरासरी ५७.०१ टक्के; महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

लोकसभा रणसंग्राम : तिस-या टप्यात सरासरी ५७.०१ टक्के; महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान

Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदारसंघातील मतदान यशस्वी झाले असून यात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्यासाठी ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्र राज्यात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान आज सकाळी देशभरात सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील १४ तर देशभरातील ११६ जागांवर मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. साधारण सकाळी ११ वाजेपर्यंत २५ ते ३० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारच्या उन्हामुळे मतदारांनी सायंकाळी येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यापेक्षा अधिक प्रमाणात लोकांनी मतदान केले. आज राज्यातील पुणे, बारामती, सातारा, जळगाव, रावेर, अहमदनगर या महत्त्वाच्या जागांवरील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून एकूण ७८.९४ टक्के इतके होते. तर त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये ७४.०५ टक्के त्याखालोखाल गोव्यामध्ये ७०. ९६ टक्के मतदान झाले आहे. तर केरळमध्ये मतदानाला गालबोट लागले आहे. येथे सहा मतदारांचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात मतदान
दरम्यान महाराष्ट्रातील १४ लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत एकूण ५५. ०५ टक्के मतदान झाले असून ते पुढील प्रमाणे आहे. जळगाव ५२.२८ टक्के, रावेर ५६.९८ टक्के, जालना ५९.९२ टक्के, औरंगाबाद ५८.५२ टक्के, रायगड ५६.१४ टक्के, पुणे ४३.६३ टक्के, बारामती ५५.८४ टक्के, अहमदनगर ५७.७५ टक्के,माढा ५६.४१ टक्के, सांगली ५९.३९ टक्के, सातारा ५५.४० टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ५७.६३ टक्के, कोल्हापूर ६५.७० टक्के, हातकणंगले ६४.७९ टक्के झाले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!