Type to search

सायंकाळी साडेसहा नंतर एक्सिट पोल दाखवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

सायंकाळी साडेसहा नंतर एक्सिट पोल दाखवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

Share

मुंबई : यंदाच्या लोकसभेच्या निवडणूक अंतिम चरणात आल्या असून आज शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. हे मतदान संध्याकाळ सहा वाजता संपताच सर्व प्रसारमाध्यमांचे एक्झिट पोल सुरु होईल. मात्र हे एक्झिट पोल साडे सहावाजेनंतर प्रसारित करावे असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

अंतिम टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलसाठी निवडणूक आयोगाची मंजूरी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा निवडणूक आयोगाची मंजूरी मिळेल, तेव्हाच एक्झिट पोल सुरु करावे असे आयोगाने सांगितले आहे.

दरम्यान या एक्सिट पोलसाठी निवडणूक आयोगाने काही नियमावाली तयार केली आहे. त्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेबसाइट आणि सोशल मीडिया माध्यमांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्या निर्देशानुसार, संध्याकाळी साडेसहा नंतर एक्झिट पोल सुरु केले जावे, असे नमूद करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१, कलम १६२A चे उपकलम (१) च्या अंतर्गत ११ एप्रिलला सकाळी सात वाजता आणि १९ मे ला संध्याकाळी साडे सहाच्या आधी एक्झिट पोलचे प्रसारण न करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांना निवडणुकींच्या निकालाचा साधारण अंदाज बांधण्यासाठी आणि उत्सुकता ताणून धरण्यासाठी हे एक्झिट पोल असतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!