मुंबई : 122 रेल्वे स्थानकांचे ऑडिट होणार

0

मंबईतील 122 रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जाणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या 75 तर पश्चिम रेल्वेच्या 47 स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी 13 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत.

गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतील.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी 29 आणि 30 सप्टेंबरला मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारपासून 10 दिवस उपनगरीय स्थानकांचं सुरक्षा ऑडिट होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*