Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

महाविकास आघाडीची ‘सत्वपरीक्षा’; बहुमत चाचणी आज

Share

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. परंतु आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा असून नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नाटकावर अखेर पडदा टाकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. त्यानंतर आता महाविकास आघाडीची सत्वपरीक्षा असून आज नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडण्यात येणार आहे. यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत महाविकासघडीतर्फे विश्वास ठराव आणला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी 3 डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी नव्या सरकारला निर्देश दिले होते. त्यानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडतील.

रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. सरकारच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!