Type to search

maharashtra

राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय दृष्टिहीन ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

Share

मुंबई : दृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण लवकरच संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून समस्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड या संस्थेच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींच्या राष्ट्रीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आज झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी त्यांना ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या विनंतीबाबत संस्थेने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना राज्यपालांनी केली.

‘डिजिटल इंडिया’ अभियानात दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता आहे असा उल्लेख करून नॅब या संस्थेने दृष्टिहीन व्यक्तींना डिजिटल इंडिया अंतर्गत रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!