Type to search

हिट-चाट

आज्या आणि शीतलीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा

Share

मुंबई : ‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या २ वर्षात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे.

या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. अज्या आणि शीतल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.

अनेक अडचणींवर मात करून, अनेकांचा रोष पत्करून शीतल व अजिंक्य एकत्र आले आणि त्यांचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. लवकरच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.

त्यांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस ते दोघे साधेपणाने साजरा करणार असून त्यासाठी अजिंक्य घरी येणार आहे. ते दोघ ही परिवारासोबत सहभोजनाचा बेत करणार आहेत तसंच हा सोनेरी दिवस अजून गोड बनवण्यासाठी ते दोघे केक कापून आनंद साजरा करणार आहेत.

लवकरच प्रेक्षक शीतल आणि अजिंक्यच्या लागण्याच्या पहिल्या वाढदिवसाचे साक्षीदार बानू शकतील. त्यांच्या आनंदात भय्यासाहेब आणि जयडी मिठाचा खडा तर नाही ना टाकणार हे प्रेक्षक लवकरच पाहू शकतील.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!