Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार सेंगरला जन्मठेप

Share
उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार सेंगरला जन्मठेप Mumbai kuldeep-singh-sengar-sentenced-to-life-imprisonment-in-unnao-rape-case

मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त पीडितेच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही कोर्टाने निर्देश दिले आहेत.

दरम्यान २०१७ मध्ये उन्नाव येथे कुलदीप सेंगर आणि त्याच्या साथीदारांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर भाजप पक्षातून कुलदीपसिंह सेंगर याला काढून टाकण्यात आले होते. आज शुक्रवारी कुलदीपसिंह सेंगरबाबतची कारवाई दिल्ली कोर्टात पूर्ण असून पोस्को कायद्यांर्गत त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याचबरोबर पीडित कुटुंबीयास आवश्यक सुरक्षा पुरविण्याचे आदेशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. तसेच प्रतिमहिना १५ हजार रुपये एकवर्षांपर्यत देण्याचे आदेशही दिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!