रितेश देशमुखकडून पूरग्रस्तांसाठी २५ लाख रुपयांचा निधी
Share

मुंबई : कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता रितेश देशमुख यांनी २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
Thank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
@Riteishd @geneliad pic.twitter.com/Y6iDng2epD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019
‘कोल्हापूर सांगली अजूनही महापुराच्या विळख्यात असून परिसरातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून, २ लाखांहून अधिक लोकांचे संसार उघडयावर पडले आहे.
दरम्यान कोल्हापूर -सांगली=या शहरांवर कोसळलेले अस्मानी संकट दूर करण्यासाठी या राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी अभिनेता रितेश देशमुख याने २५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेकद्वारे दिली.