Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले काळाच्या पडद्याआड

Share

मुंबई : रुस्तम-ए-हिंद म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ कुस्तीगीर दादू चौगुले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील तालमीवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान दादू चौगुले यांना ‘महान भारत केसरी’, मानाचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच त्यांनी दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई त्यांनी केली होती.

देशविदेशातील अनेक मल्लाना त्यांनी लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविले होते. वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावात कुस्ती खेळायला सुरुवात केली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत दादू चौगुलेंनी अनेक मानाच्या गदा पटकावत कोल्हापूरचा जरीपटका सर्वत्र मानाने फडकवत ठेवला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!