Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

Share

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड केली आहे. कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून ते सलग आठ वेळा निवडून आले होते. गोपनीयतेची शपथ घेण्यासाठी कोळंबकर हे राजभवनात पोहोचले आहेत.

राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करू शकत नसल्याने सरकार स्थापन करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आत महाशिवआघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. त्यानुसार राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळा निवडून आले होते. शिवसैनिक ते भाजपचे नेते असा त्यांचा प्रवास आहे. त्यानंतर ते नारायण राणे यांच्यांसोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती.

त्यानंतर सकाळापासूनच्या घटनाक्रमानंतर महाशिवआघाडीला बहुमत सिद्ध कर्णयसाठी निमंत्रण येऊ शकते.त्या नुसार हंगामी अध्यक्षांची निवड करावी लागते. त्यासाठी सभागृहातला सर्वात ज्येष्ठ आमदार यासाठी निवडला जातो. त्यामुळे आता कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!