Type to search

हिट-चाट

‘कलंक’ची बॉक्स ऑफिसवर पन्नास कोटींची कमाई

Share

मुंबई : १७ एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘कलंक’ चित्रपट रिलीज झाला.

२१ कोटींचा गल्ला चित्रपटाने पहिल्या दिवशी जमवला. पण या चित्रपटाकडे पहिल्याच दिवशी झालेल्या निराशेमुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ५४.४० कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच चित्रपटाला १०० कोटींचा गल्ला गाठण्यासाठीही आणखी काही दिवस प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

या चित्रपटात वरूण धवन आणि आलिया ही जोडी चौथ्यांदा एकत्र झळकत आहे. त्यांचे याआधीचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडूनही भरपूर अपेक्षा होत्या. हे कलाकार ज्या पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!