Type to search

हिट-चाट

काजोलचा तानाजी सिनेमातील मराठमोळा लूक व्हायरल

Share

मुंबई : अजय देवगणचा बहुचर्चित ऐतिहासिक तानाजी या सिनेमाचा ट्रेलर येण्या अगोदर काजोलचा मराठमोळा लुक समोर आला आहे. यामध्ये काजोल सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत आहे.

अजय देवगण आणि काजोल ही बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी असून ‘तानाजी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या सिनेमातील काजोलचा लूक आला आहे. काजोल तानाजी सिनेमामध्ये सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.

सावित्रीबाई मालुसरे या तानाजी मालुसरेंच्या पत्नी होत्या. काजोलचा केशरी साडीमधील मराठमोळ्या अंदाजातील लूक शेअर करण्यात आला आहे. उद्या ‘तानाजी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!