Video : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं ! ‘कागर’चा ट्रेलर रिलीज

0

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहचलेली आरची उर्फ रिंकू राजगुरूच्या कागर सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. यामध्ये रिंकू राजगुरू सोबत शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता पदार्पण करत आहे.

दरम्यान ‘कागर’चा टीझर आणि पहिले गाणे ‘लागिलिया गोडी तुझी’ यानंतर रसिकांना ‘कागर’च्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. आज कागरचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून ग्रामीण राजकारण आणि प्रेम याच्या संघर्षात फुलणारी प्रेमकहाणी हे चित्र या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

सैराट तीन वर्षांनी पुन्हा मराठी रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. ‘कागर’मधून ग्रामीण राजकारण, नव्या नेतृत्त्वाचं आगमन सोबत प्रेमामध्ये होणारा संघर्ष याचं चित्रण करण्यात आलं आहे.

रिंकू या सिनेमात ‘राणी’ ही भूमिका साकारत आहे. ‘कधी कधी शर्यत जेथून सुरू होते तिथेच येऊन संपते’ या रिंकूच्या डायलॉगमध्येच या सिनेमाच्या कथेचा अंदाज येतो. अनपेक्षितपणे घरात राजकारणाचा वारसा असलेल्या राणीचा (रिंकू) राजकारणामध्ये प्रवेश होतो. राजकीय डावांमध्ये राणी आणि तिचा प्रियकर कुठल्या वळणावर येऊन ठेपतं याची झलक ट्रेलरमध्ये पाहता येते. रिंकूचा पुन्हा दमदार अभिनय, नवं स्वावलंबी स्त्री पात्र ‘कागर’ सिनेमात पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

*