Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा सर्वोच्च ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’

Share

मुंबई : यंदाचा सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार पत्रकार रवीश कुमार यांना जाहीर झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यंदाचा हा पुरस्कार पटकावणाऱ्या एकूण पाच लोकांपैकी रवीश कुमार हे एकमेव भारतीय असून यामध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलँडच्या अंगखाना नीलापजीत आणि फिलिपिन्सचे रेमुंडो पुजांते कैयाब हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रवीश कुमार हे भारतातील एका खासगी वृत्तवाहीनीवर प्राइम टाइम या कार्यक्रमात लोकांच्या प्रश्न मांडत असतात.

आशिया खंडातील नोबेल अशी रॅमन मॅगसेसे पुरस्काराची ओळख आहे. या पुरस्कारानंतर संस्थेने सांगितले कि, रवीश कुमार आपल्या कार्यक्रमातून तळागाळातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच त्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!