Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

लवकरच रेल्वेत 9 हजार पदांची भरती; महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव

Share

मुंबई : रेल्वेत ९ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी असून यामध्ये महिलांना ५० % टक्के स्थान देण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे. तसेच त्यांनी ट्विटरवरून देखील ही माहिती दिली आहे.

दरम्यान पुढील दोन वर्षात ९९ हजार पदे रिक्त होणार असल्याने येत्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने हि भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी दीड लाखांहून अधिक पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. यात एक लाख ३० हजार पदे भरायची शिल्लक राहिली होती. तसेच येत्या काळात देखील ही भरती प्रकिया सुरु असणार आहे.


येत्या दोन वर्षात अडीच लाखांच्या आसपास पदांची जाहिरात करण्यात येणार आहे. तर यामधील एक लाख ३० हजार पदांच्या नवीन भरतीचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू करण्यात येईल.

या भरतीत अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय पदांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भरतीची ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून दिली माहिती

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!