Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राजकीय सत्तानाट्य : जयंत पाटील यांच्याकडून अजित पवार यांची मनधरणी

Share

मुंबई : अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे मन वळवण्यासाठी जयंत पाटील त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. तर गेल्या एक तासापासून या दोघांमध्ये बैठक सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडत भाजपाला साथ देत शनिवारी अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर या महानाट्यावर आक्षेप घेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, यावर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तापेचावर तातडीची सुनावणी करण्यात आली.

दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत काय चर्चा होतेय हे औत्सुक्याचे ठरत आहे. जयंत पाटील यांच्याकडून अजित पवारांचे मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. तर शरद पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटण्यास जात आहेत. त्यामुळे आजचा दिवशी सत्ता नाट्याचा एक भाग असणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तर दुसरीकडे एक तासाच्या सविस्तर युक्तिवादांनंतर कोर्टाने राज्यपालांकडे आलेली कागदपत्रे कोर्टासमोर सादर करण्यासाठी उद्या सकाळी साडे दहावाजेपर्यंतचा अवधी देऊन पुढील सुनावणी उद्या घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी तातडीने फ्लोर टेस्ट घेण्याबाबत कोर्टाने काहीही निर्देश दिलेले नाहीत. न्यायमूर्ती एन.व्ही. रामन्ना, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!