Type to search

हिट-चाट

सोशल मीडिया हे प्रचाराचं आणि संपर्काचं माध्यम – इशा केसकर

Share

मुंबई : सोशल मीडियाच्या युगात आजकाल एखादी गोष्ट अगदी काही सेकंदातच लोकांपर्यंत पोचते. तसेच हे माध्यम सुलभ असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया देखील या माध्यमावर लगेचच उमटतात. ट्रोलिंग हा देखील त्याचाच एक भाग आहे. तसंच सध्या प्रत्येक नव्या गोष्टीवर मिम्स देखील वायरल होताना आपण पाहत आहोत. कलाकारांवर देखील मिम्स बनतात आणि त्यांना ट्रोल केलं जातं.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली, कमालीची लोकप्रिय ठरलेली शनाया म्हणजेच अभिनेत्री इशा केसकर ही सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या मिम्स बद्दल बोलताना म्हणाली,”सोशल मीडियावर इतके सारे मीम्स येत असतात, जोक्स येत असतात. अनेक लोक चांगलं बोलतात, अनेक लोक वाईट बोलतात.

एखाद्याचा आत्मविश्वास पूर्ण संपून जाईल इतकं वाईट बोलतात. मात्र त्या गोष्टींना एवढं मनावर घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. माझ्या मते तरी सोशल मीडियाचं आयुष्य हे एका दिवसाचं असतं.

आज एक विषय, उद्या एक विषय असं लोकांना चर्चेला मिळतच असतं. काल आपण कोणकोणत्या पोस्ट पाहिल्या हे आपल्याला आज लक्षातही राहत नाही. त्यामुळे त्या गोष्टींना तेवढंच महत्त्व आपणही द्यावं. आम्ही कलाकार तर केवळ प्रसिद्धी किंवा आमचे नाटक-मालिका, कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावेत इतक्याच उद्देशाने या सोशल मीडियाचा वापर करतो.

त्यावर लोक काय बोलतात, याच्याशी देणं-घेणं नसतं आणि त्या माध्यमाकडे केवळ प्रसिद्धी किंवा संपर्काचे माध्यम इतक्या मर्यादित अर्थानेच पाहायला हवे.”

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!