Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

आयपीएल १२ : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ संघाचा बोलबाला असणार

Share

नाशिक : इंडियन प्रीमियर लीगचा २०१९ चा मोसम हा आयपीएल १२ किंवा विवो आयपीएल २०१९ म्हणूनही ओळखला जाणारी स्पर्धा एप्रिल-मे २०१९ मध्ये खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या टी२० क्रिकेटचा हा बारावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१८ चा मोसम ७ एप्रिल २०१७ रोजी सुरु झाला तर २७ मे २०१८ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता झाली. २०१८ च्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

कोलकाता नाईट रायडर्स :

संघाचा नारा : कोरबोलॉरबो जीतबो
मालक: शाहरुख खान, जुही चावला, सीईओ वेनकी मयसूर

कर्णधार दिनेश कार्तिक, माजी कर्णधार गौतम गंभीर
कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघाला आजपण आयपीएल स्पर्धेतील मोस्ट कंसिस्टन्ट टीम म्हणून ओळखतो. २००८-२०१८ या दहा वर्षात या संघाने आईपीएल स्पर्धेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील ११ वर्षात या संघाच्या कामगिरीवर आपण जर नजर टाकली तर या संघाने ६ प्लेऑफ आणि दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

२००८ -२०१८ या संपूर्ण ११ वर्षात सुरुवातीचे तीन वर्ष या संघाचे कर्णधारपद सौरव गांगुलीकडे सोपवण्यात आले होते. पण हा संघ तळाला असायचा. १४ लढतींपैकी केवळ ४ विजय आणि १० पराभव २०११ च्या लिलावात या संघाने दिल्लीकर फलंदाज गौतम गंभीरला साडे अकरा कोटी रुपयात संघात सहभागी करून घेतले. या संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरच्या हाती सोपवल्यानंतर संघाने २०११-२०१७ या सहा वर्षात ४ वेळा प्लेऑफ गाठला आहे. कोलकाता

संघातील नावाजलेले खेळाडू : सौरव गांगुली, गौतम गंभीर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पीयूष चावला कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळताना न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ब्रेडन मॅकल्म याने बंगळूर विरुद्ध २००८ साली झालेल्या आयपीएल उदघाटनाच्या सामन्यात चौकार षटकारांची चौफेर आतषबाजी करत १५३ धावा कुटल्या व आयपीएल मधील पहिले दीडशतक ठोकले होते, पण कोलकाता संघासाठी एक रडगाणे म्हणजे मुंबई इंडिन्स विरुद्ध झालेल्या २२ लढतीमध्ये या संघाला ५ सामन्यात विजय साकारता आले आहे.

मुंबई इंडियन्स, नारा : दुनिया हिला देंगे
मालक :  नीता अंबानी, मुकेश अंबानी, जर्सी कलर निळा गोल्डन लोगो : पूर्वीचा हिरोहोंडा, व्हिडिओकॉन, सध्याचा सॅमसंग मेंटॉर सचिन तेंडुलकर, फिल्डिंग कोच रॉबिन सिंग, कर्णधार रोहीत शर्मा

मुंबई इंडियन्स संघाला आज आपण आइपीएल मधील सर्वात यश्यस्वी संघ म्हणून ओळखतो. मुंबई संघाची आतापर्यंतची ११ हंगामातील कामगिरी बघता या संघाला ७ प्लेऑफ आणि तीन वेळा विजेतेपदाचा मान पटकावता आला आहे. २००८-२०१२ या चार वर्षात संघाचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हाती सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात मुंबई संघाला ३ प्लेऑफ गाठता आले मात्र विजेतेपदाचे स्वप्न काही साकार होऊ शकले नाही म्हणून मुंबई संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले सलामी पाच सामन्यात मुंबई संघाची स्थिती जर तरच्या समीकरणात फसलेली होती. उर्वरित ९ सामन्यांमध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबई संघाला कमीत कमी सहा लढती जिंकणे आवश्यक होते.

अशा परिस्थितीत संघव्यस्थापनाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला संघाचे नेतृत्व रोहीत शर्माच्या हाती सोपवले मुंबई संघाचे नशीब अचानक पलटले उर्वरीत सर्व सामने जिंकून मुंबई संघाने आठव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप मारली क्वालिफार १ मध्ये मुंबईला दोन वेळचा आइपीएल विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज कडून आपल्या घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव करत अंतिम फेरीत पुन्हा गाठ पडली ती चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले मुंबई संघाचे सलामी फलंदाज आपला फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत पण विंडीज संघाचा अष्टपैलू किरॉन पोलार्डच्या ६० धावांच्या खेळीमुळे मुंबई संघाला २० षटकात १४८ धावा करता आल्या मुंबई संघातर्फे लसिथ मलिंगा आणि मिचेल जॉन्सन यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे मुंबई संघाने चेन्नई संघाला १२५ धावत रोखले व आपले पहिले विजेतेपद पटकावले २०१५ मध्ये मुंबई संघाने चेन्नई संघाला अंतिम सामन्यात नमवत दुसरे जेतेपद पटकावले २०१७ साली नव्याने आयपीएल मध्ये सहभागी झालेल्या रायझिंग पुणे सुपर जायंट संघाचा अवघ्या १ रन् ने धुवा उडवत तिसरे जेतेपद जिंकले २०१९ मध्ये चौथे विजेतेपद जिंकले

चेन्नई सुपरकिंग्स

जर्सी : पिवळा (एअरसेलच लोगो असलेले) टि शर्ट

सोंग व्हिसल पोडू, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे, कर्णधार एमएस धोनी, मालक मुथूट ग्रुप पूर्वीचे गुरुनाथ मैयापन

आईपीएल स्पर्धेत २००८-२०१८ या ११ सत्रात चेन्नई संघाने ९ प्लेऑफ व तीन वेळा स्पर्धा जिकली आहे २००८ -२०१५ या सात वर्षात चेन्नईने सहा वेळा अंतिम फेरी गाठली आहे चेन्नई संघाने पहिले विजेतेपद २०१० साली पटकावले होते या वर्षी चेन्नई संघाची सुरुवात निराशाजनक झाली सुरुवातीचे ५ सामने चेन्नई संघाने आपल्या खेळात कमालीचा बदल केला उर्वरित सर्व सामने जिंकत त्यांनी अंतिम फेरी गाठली चेन्नई संघाने अंतिम सामन्यात मुंबई संघाचा १८ धावांनी पराभव केला व पहिले विजेतेपद जिंकले २०११ साली चेन्नई संघाने अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा पराभव केला व दुसऱ्यांदा स्पर्धा जिकली पण २०१३ साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे २०१६ -२०१७ या हंगामासाठी चेन्नई संघाला निलंबित करण्यात आले २०१८ याच वर्षी चेन्नई संघाने आयपीएल स्पर्धेत नव्याने प्रवेश घेतला असे असले तरी आपला चॅम्पियन सारखा खेळ करत अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघावर मात करत तिसरे विजेतेपद पटकावले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
जर्सी : लाल, जीओनी, प्लेबॉल्ड रॉयल चॅलेंजर्स

मालक पूर्वीचे विजय मल्ल्या सिद्धार्थ मल्ल्या कर्णधार विराट कोहली प्रशिक्षक डेनियल व्हिटोरी होम ग्राउंड एम चिन्नास्वामी बंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा मागील ११ वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर या संघाला आतापर्यंत एकदाही स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आलेले नाही या संघाने ११ वर्षात ३ वेळा अंतिम फेरी गाठली आहे ५ वेळा प्लेऑफ गाठता आला आहे विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स हे दोन खेळाडू या संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहेत ११ वर्षात बंगळूरच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची फलंदाजी ही केवळ टॉप ३ वर अवलंबून आहे मधली फळी पूर्ण कमजोर आहे येत्या १८ डिसेंबरला आयपीएलचा लिलाव जयपूरमध्ये होणार आहे बंगळूर संघाला मधल्या फळीत एका स्पेशियालिस्ट फलंदाजांची गरज आहे बंगळूर संघाला पराभूत होण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे संघ बांधणी करण्यात आलेले अपयश बंगळूर संघाची नीचांकी धावसंख्या ४९ विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स २०१७ कोलकाता सर्वाधिक धावसंख्या २६३-५ बंगळूर संघातफे क्रिस गेलने १७५ धावा २०११ च्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध बंगळूर येथे ठोकल्या होत्या विराट कोहलीने २०१६ च्या हंगामात बंगळूर संघाकडून खेळताना १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक ९३४ धावा फटकावल्या होत्या यात त्यांनी चार शतके देशील ठोकली होती बंगळूर संघ साखळी सामन्यातमध्ये अव्वल कामगिरी करतो पण जेव्हा जेव्हा उपउपांत्यपूर्व , उपांत्य सामन्यांची वेळ येते तेव्हा संघ कच खातो याला इंग्रजीत चोकर्स असे म्हणतात इंटरनॅशनल विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका जशी कामगिरी करतो अगदी तशीच कामगिरी बंगळूर आईपीएल मध्ये करतो आइपीएल लिलाव प्रक्रियेत बंगळूर संघ नुसत्या आपल्या संघातील रिकाम्या जागा भरतो डोके लावून खेळाडू घेत नाही

किंग्ज इलेव्हन पंजाब

जर्सी : लाल, केंट ऑरो प्युअर
मालक : नेस वाडिया, प्रीती झिंटा, नारा पंगा ना लो
मोहाली, होळकर क्रिकेट मैदान इंदूर कर्णधार आर अश्विन

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला गेल्या ११ वर्षात केवळ दोन प्ले ऑफ आणि एकदा अंतिम फेरी गाठता आली आहे. २०१० आणि २०१४ हे सत्र सोडल्यास पंजाब संघ तळाला कायम आहे. आजवर संघ व्यवस्थापनाने अनेक खेळाडूंना संघाचे कर्णधापद देण्यात आले. कुमार संगकारा आणि जॉर्ज बेली यांच्या नेतृत्वात पंजाब संघ टॉप ४ मध्ये दाखल झाला आहे यंदाच्या वर्षी संघाचा मार्गदर्शक म्हणून भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याची निवड करण्यात आली होती तर कर्णधार म्हणून आर अश्विन याला निवडण्यात आले होते पण पंजाब संघाने यंदाच्या वर्षी १४ पैकी सुरुवातीचे सहा सामने जिंकून दणक्यात सुरुवात केले होती पण नंतरच्या आठही लढतींमध्ये सलग पराभवांमुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टत आले याचे प्रमुख कारण म्हणजे संघाच्या कामगिरीत सातत्याचा असलेला अभाव पंजाब संघातफे आतापर्यंत केवळ दोन खेळाडूंना स्पर्धेत शतके झळकावता आली आहेत. वृद्धिमान सहा १०१ धावा अंतिम सामना २०१४ विरुद्ध केकेआर वीरेंद्र सेहवाग १११ वानखेडे मैदान मुंबई सेमी फायनल विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज २०१४ यंदाच्या १२ व्या हंगामासाठी संघव्यवस्थापनाने मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रायन ह्यरिस यांची नियुक्ती केली आहे

राजस्थान रॉयल्स
२००८ साली आईपीएल स्पर्धेच्या पहिल्या वर्षी अंतिम सामन्यात शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने एम एस धोनीच्या चेन्नई संघाचा पराभव केला व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते २००८-२०१८ या ११ वर्षातील राजस्थान रॉयल्स संघाला ४ वेळा प्लेऑफ गाठता आला राजस्थान रॉयल्स संघातर्फे आतापर्यंत युसूफ पठाण ने शतक झळकावले आहे २०१३ साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने चेन्नई सुपर्किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाला २०१६-२०१७ साली निलंबित कारण्यात् आले होते जर्सी कलर निळा पूर्वीचा लोगो अल्ट्रा टेच सिमेंट राजस्थान रॉयल्स संघाची आइपीएल मधील सर्वाधिक धावसंख्या २४१ विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज कर्णधार अजिक्य राहणे प्रशिक्षक पॅडी ओप्तोन ओनर मनोज बडाले होम ग्राउंड ब्रेबॉन मैदान मुंबई आणि सवाई मानसिंग मैदान जयपूर

सनराईझर्स हैद्राबाद
आयपीएल स्पर्धेत सनराईझर्स हैद्राबाद संघाचे पूर्वीचे नाव डेक्कन चार्जेर्स असे होते या संघाचे थीम सोंग गो चार्जेर्स असे होते २००९ साली दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात गुणतालिकेत आठव्या स्थानावरून या संघाने थेट विजेतेपद जिंकले होते या वर्षी आर पी सिंग याने पर्पल काप वर आपले नाव कोरले होते रोहीत शर्माने मुंबई इंडियन्स विरुद्ध हयाट्रिक घेत स्पर्धेतील पहिली हायट्रीक नोंदवली होती २०१० ते २०१२ या तीन वर्षात संघाचा फॉर्म थोडासा ढासळत गेला आयपीएल लिलाव प्रक्रियेत पुरेसा निधी उपलबध नसल्याने संघ व्यवस्थापनाने २०१३ च्या हंगामात सनराईझर्स हैद्राबाद या नव्या नावाने आपला प्रवेश नोंदवला डेक्कन चार्जेर्स नाव असताना यांची जर्सी हलक्या निळ्या रंगाची होती मात्र सनराईझर्स हैद्राबाद संघाने २०१३ मध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांची जर्सी फिक्या ब्राऊन रंगाची होती व लोगो केशरी आणि पिवळ्या रंगाचा होता २०१४-२०१८ या चार वर्षात केशरी आणि काळ्या रंगाची बॉर्डर आणि त्यावर ९३. ५ रेड एफएम असे स्टिकर आहे २०१६ साली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले कर्णधार डेविड वॉर्नरने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ८७२ धावांसह दुसरे स्थान पटकावले तर भुवनेश्वर कुमारला पर्पल कॅप्चा मान देण्यात आला हेंद्राबाद संघाला ४ वेळा प्लेऑफ गाठता आला आहे याच वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या कसोटी मालिकेत बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळून आल्याने नियमित कर्णधार डेव्हीड वॉर्नरला निलंबित करण्यात आले व संघाचे कर्णधारपद केन विल्यम्सनकडे सोपवण्यात आले यंदाच्या वर्षी हैद्राबाद संघाने उपविजेतेपदाचा मान पटकावला संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी असून गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन आहे राजीव गांधी मैदान हैद्राबाद हे या संघाचे घरचे मैदान आहे

दिल्ली कपिटल्स
आयपीएल स्पर्धेत २००८- २०१८ या ११ सत्रांमध्ये एकदाही विजेतेपद जिंकू न शकलेला तिसरा संघ म्हणजे दिल्ली संघ होय. जर्सी निळ्या व पांढऱ्या दुहेरी रंगांची आहे. पूर्वीचा लोगो हिरोहोंडा सध्याचा डायकिन दिल्ल्ली संघाची गेल्या ११ वर्षातील कामगिरी पाहिली तर या संघाला ३ वेळा प्लेऑफ गाठता आला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. पूर्वीचे थीम सॉंग धुवाधार दिल्ली बदलेले ढासू दिल्ली संघाचे होम ग्राउंड फिरोजशहा कोटला मैदान दिल्ली येथे आहे.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!