आयपीएल लिलावात एकूण ९७१ खेळाडू वर्तुळात

आयपीएल लिलावात एकूण ९७१ खेळाडू वर्तुळात

नाशिक : आयपीएल २०१९ १३ व्या हंगामाचा लिलाव येत्या १९ डिसेंबरला कोलकात्यात होणार आहे. या लिलावात एकूण ९७१ खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये ७१३ खेळाडू भारतीय तर २५८ विदेशी खेळाडू आहेत ऑस्ट्रेलियाचे ५५ खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत. आठही संघ मिळून ७३ जागा शिल्लक आहेत ऑस्ट्रेलिया संघाचा डावखुरा लेफ्ट आर्म तेज गोलंदाज मिचेल स्टार्क याने लिलावातून माघार घेतली आहे.

२९ वर्षीय मिचेल स्टार्कने २०१५ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून आपली शेवटची म्याच खेळली होती. २०१८ साली झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात कोलकात्याने स्टार्कला ९. ४ कोटी मध्ये खरेदी केले होते. पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. २०१९ मध्ये तो दुखापतीतून सावरत होता. पण विश्वचषकाच्या साठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.

आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचे स्टार्कचे हे पाचवे वर्ष आहे. २०१६ मध्ये दुखापतीमुळे तो बाहेर होता. २०१७ हंगामात त्याने आपले नाव मागे घेतले होते. २०१८ मध्ये कोलकात्याकडून तो एकही सामना खेळू शकला नव्हाता. बंगळूरकडून त्याने २७ सामन्यांमध्ये २०. ३८ च्या सरासरीने एकूण ३४ विकेट्स काढल्या होत्या. २०१४-२०१५ हंगामात तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. १५ धावा ४ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टीम            एकूण रक्कम
कोलकाता    ३५. ६५ कोटी
चेन्नई         १४. ६० कोटी
दिल्ली         २७. ८५ कोटी
पंजाब         ४२. ७० कोटी
मुंबई          १३. ०५ कोटी
राजस्थान   २८. ९० कोटी
बंगळूर       २७. ९० कोटी
हैद्राबाद      १७ . ०० कोटी

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com