Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आता प्रवाशांनाही कळणार रेल्वेचे रिअलटाईम लोकेशन 

Share
नाशिक : भारतीय रेल्वे हि भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा असून  रेल्वे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. आजच्या घडीला भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६३,१४० कि.मी.  इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज सुमारे १ कोटी ६० लाख प्रवाशांची, तसेच १४ लाख टन मालाची वाहतूक करते.  हे रेल्वेचे जाळे खूप मोठ्या प्रमाणावर पसरले आहे, रोज हजारो रेल्वे रेल्वे मार्गांवरून आपला मार्गक्रमण करत असतात.
बऱ्याचदा रिअलटाईम लोकेशन प्राप्त करण्यात गडबडी त्याच प्रमाणे व्यवस्थापनात कसूर किंवा चुका यामुळे अपघात होतात यात निरपराध लोक मृत्युमुखी पडतात तसेच मालवाहतुकीत नुकसान होते. प्रवाश्यांनाही रिअलटाईम लोकेशन  न मिळाल्याने वेळेवर प्लॅटफॉर्म वर पोहचणे शक्य होईल किंवा पर्यायी प्रवासी व्यवस्था करण्याची सोय होईल.  या दृष्टीने श्री महावीर पॉलिटेक्निक नाशिक मध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या  मनोज बागुल , कावेरी हटकर , कुणाल राजपूत , प्रियंका पाळदे या विद्यार्थ्यांनी ‘स्प्लिट प्लॅटफॉर्म ऑफ ट्रॅक्शन सिस्टिम कंट्रोल युजींग कॉम्प्युटराइज्ड कंट्रोल सिस्टिम हा प्रकल्प 2019 – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या प्रकल्प प्रात्यक्षिकात सादर केला आहे.

जीएसएम, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेचे लोकेशन सहजरित्या प्रयेक प्रवाशाला याद्वारे मिळण्याची सोय केली असून प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे. वृद्धांना चालण्यात अडचणी असतात रिअल टाईम मुळे किती वेळ आहे हे कळल्यामुळे नाहक होणारी धावपळ त्याची वाचते, प्लॅटफॉर्म ओलांडणे , जिने चंदने उतरणे यासाठीची धावपळ वाचेल .

प्रकल्पातून जर रेल्वेत काही खराबी आली असेल तर कंट्रोल सिस्टमला त्वरित स्वयंचलित प्रणालीव्दारे निरोप जातो. डिजिटल  इंडिया अंतर्गत विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प तयार केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकल्पाची आणि संशोधनाची माहिती देण्याची धड्पड सध्या विद्यार्थ्यांकडून सुरु आहे असे यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तसेच महावीर पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख प्रा. सागर पाटील यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांना सादर प्रकल्प बनविण्यात प्रा. आदित्य अहिरे , प्रा. सुवर्णा जाधव याचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्व्स्थ श्री राहुल संघवी , डीन  डॉ. प्रियंका झंवर, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री संभाजी सगरे, प्रा. संजय भामरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी तसेच विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे .
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!