Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका ५ ऑक्टोबर पासून

Share

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमधील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या ५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या व्हायझ्याग या मैदानावर सुरुवात होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजता स्टार स्पोर्ट्सवर करण्यात येणार आहे.

३ सामन्यांची टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत राखल्यानंतर आता कसोटी मालिकेतही विजयी शुभारंभ करण्याचा भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचा प्रयत्न आहे. शिवाय भारतीय निवड समितीने कसोटी संघातून लोकेश राहुलला खराब फॉर्म मधून जात असल्यामुळे संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्याजागी शुभमन गील या युवा खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. मयंक अगरवाल सोबत रोहित शर्मा कसोटीत सलामीला उतरण्याची शक्यता आहे. शिवाय दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस कसोटी मालिकेत संघात परतत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची ताकद वाढली आहे.

आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार डीन एल्गार, टेम्बा बाऊमा, एडन माक्रम, फाफ डू प्लेसिस, तेउनीस दे ब्रुईन, क्विंटन डिकॉक, हेन्री क्लासेन यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये व्हार्मन फिलँडर आहे. तर गोलंदाजीत केशव महाराज, कांगिसो रबाडा, डेन प्रिडेट, एड्रीच नॉर्टीजे, लुंगी इंगिडी आहेत.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुभमन गील, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, रिद्धिमान सहा, अजिंक्य राहणे यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये आर अश्विन, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा आहेत. गोलंदाजीत इशांत शर्मा, उमेश यादव, मोहंमद शमी आणि कुलदीप यादव आहेत.

या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या भारत ४५५ १७ नोव्हेंबर २०१६ नीचांकी धावसंख्या इंग्लंड १५८ सर्वात मोठा विजय भारत २४६ धावांनी विरुद्ध इंग्लंड या मैदानावरील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली.

सामना १ २४८ धावा सर्वाधिक स्कोर १६७ सर्वाधिक अर्धशतके विराट कोहली२ सर्वाधिक बळी आर अश्विन १ सामना २ डाव १७ निर्धाव ११९ धावा ८ बळी बेस्ट फिगर्स आर अश्विन २९ षटके ६ निर्धाव ६७ धावा ५ विकेट्स

आमनेसामने ३६ भारत विजयी ११ आफ्रिका विजयी १५
प्रमुख आकर्षण रहाणे, पुजारा, कोहली, फाफ डू प्लेसिस, रबाडा

हवामान : अंशतः सूर्यप्रकाश दुपारी हलका पाऊस शक्य

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!