Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

ठाणे : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

Share

मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आज भिंवडी येथे केमिकल गोदामाला आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक अग्निशामक दलाची चार वाहने घटनास्थळी दाखल झाली. या आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.

सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाली नाही. सुरूवातीला एका गोदामाला लागलेली आग हळूहळू पसरत तिसर्‍या गोदामापर्यंत पोहचली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या ठिकाणी केमिकल गोदाम असल्याने या परिसरात असणाऱ्या ज्वलनशील पदार्थांच्या स्फोटामुळे लागली असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!