Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या हिट-चाट

मुंबई : टॅक्सी ड्राइवर असणाऱ्या ‘नामदेव भाऊं’ना बेस्ट ऍक्टरचे नामांकन

Share

मुंबई : मुंबईमध्ये राहणाऱ्या नामदेव गुरव या ६५ वर्षीय टॅक्सी ड्राइवरने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मेलबर्न येथे रंगलेल्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमध्ये निवड झाली आहे. ‘नामदेव भाऊ : इन सर्च ऑफ सायलेन्स’ या चित्रपटातुन पदार्पण केले आहे. या चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका असून चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे उत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले आहे.

दरम्यान याच फिल्म फेस्टिवलमध्ये नामदेव गुरव यांच्याबरोबर अमिताभ बच्चन, आयुष्यमान खुराणा, मनोज बाजपेयी आणि विकी कौशल यांची देखील नामांकन मिळाले आहेत.

या चित्रपटाचे निर्माते धीर मोमया यांनी नामदेव यांची निवड केल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक दर गई यांनी पहीला सर्व पाहिल्यानंतर लागलीच या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे सांगितले.

नामदेव गुरव या निवडीवर सांगतात की, माझ्या कुटुंबियांसाठी अत्यंत आंनददायक गोष्ट असून मी देखील खूप आनंदी आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही कि मी या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात काम करण्यापूर्वी महाराष्ट्राबाहेर कधी गेले नव्हतो परंतु आता देशाबाहेरही जाण्याची संधी मिळते आहे, यामुळे माझ्या जीवनात न होणारा बदल झाला असल्याचे नामदेव गुरव यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!