घटनेने दिलेल्या समान स्त्री-पुरुष अधिकाराची पावलोपावली पायमल्ली

0

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-आज हजार मुलांपाठोपाठ केवळ सरासरी केवळ 800 मुलींचा जन्मदर दिसून येतो. शिवाय निसर्गाने, राज्य घटनेने स्त्री व पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. मात्र त्याची पायमल्ली पावलोपावली होताना दिसते. महिलांनाही समान दर्जा मिळावा तसेच त्यांचा सन्मान योग्यरीतीने झाल्यास राज्य घटनेची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी होईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

तालुका वकील संघ व तालुका विधिसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य घटना व मानवाधिकार या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन बोरावके हाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आल होते. त्याप्रसंगी न्या. शिंदे बोलत होते. जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी, न्या. आर. डी. पाटील, वकील परिषदेचे सदस्य अशोक पाटील, श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायाधीश बघेले, श्रीमती बोरा, न्यायमूर्ती चव्हाण, न्यायमूर्ती श्रीमती टोम्पे, न्यायमूर्ती श्रीमती बंडे, न्यायमूर्ती पवार, न्यायमूर्ती बोमडीवार, रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर विभागाच्या अध्यक्षा मीनाताई जगधने, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. युसूफ शेख, अ‍ॅड. मुखेडकर, सुरेश बनकर, तहसीलदार सुभाष दळवी, पोलिस उपअधीक्षक अरुण जगताप, मुख्याधिकारी सुमंत मोरे आदी उपस्थित होते.

न्या. शिंदे म्हणाले, समाजात आज राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांसाठी लोकांना भांडताना आपण पाहतो. मात्र तेथे आपल्या मूलभूत कर्तव्यांप्रती नागरिक उदासन दिसतात. शिक्षणाचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर समाज व शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी अधिक वाढली आहे. आपल्या अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांची जाणीव मुलांना बालवयातच रुजविली पाहिजे. आजची तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या जाळ्यात सापडलेली आहे. लाखो विद्यार्थी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या चक्रव्यूहात अडकलेली आहे. त्यांचा अनमोल वेळ यामध्ये वाया जात आहे.

सोशल मीडियावर वेळ खर्च करण्यापेक्षा इतिहासाची पुस्तके वाचा. ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. अशा महापुरुषांचे चरित्र वाचावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे आत्मबल वाढेल. समाजातील प्रत्येक घटकाच्या मूलभूत अधिकाराचा वापर केला पाहिजे. आपल्या अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांची जाणीव बालवयातच रुजविली पाहिजे,
न्या. माळी यांनी मानवाधिकाराच्या हक्कांबाबत माहिती दिली. प्रास्ताविक अ‍ॅड. शेख यांनी केले. तसेच वकील संघाच्या काही मागण्याही त्यांनी न्या. शिंदे यांच्यासमोर मांडल्या. सूत्रसंचालन अ‍ॅड. समीर बागवान यांनी केले. अ‍ॅड. प्रसन्ना बिंगी यांनी आभार मानले.

श्रीरामपूरच्या महिला प्रत्येक ठिकाणी पुढेच असतात –
कालच्या कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त होती. याबाबत न्यायाधिश श्री. शिंदे यांनी कौतुक केले. नाही तरी श्रीरामपूरच्या महिला या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, रयतच्या सौ. मीनाताई जगधने यासारख्या अनेक महिलांचे कार्य खूपच चांगले असल्याचेही न्यायाधीश श्री. संभाजी शिंदे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*