Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रोइंगपटू दत्तू भोकनळवरील गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

Share

नाशिक | प्रतिनिधी

भारताचा रोईंग क्रीडाप्रकारातील ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याच्याविरोधात आडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला फसवणुकीचा गुन्हा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज रद्द केला. यामुळे भोकनळ यास दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दोघांनी लग्न केले असून दोघांना ते मान्यही आहे. तसेच हुंडयाबाबतचा उल्लेख तक्रारीत कुठेही नाही त्यामुळे या गुन्ह्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे व  भारती डांगरे यांनी याबाबतचा निर्णय दिला. सदर प्रकरणात दत्तू भोकनळ यांच्या वतीने ऍड रविराज परामणे, ऍड वैभव गायकवाड, ऍड जयदीप वैशंपायन यांनी काम बघितले.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मनोबल वाढले आहे. ऑलिम्पिकसाठी सराव चालू होता आणि आता अधिक जोमाने प्रयत्न करून टोकियो २०२० मध्ये देशासाठी पदक आणणार असून देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती दत्तू भोकनळ याने देशदूतशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!