Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबईत पावसाचा कहर; गडचिरोलीतही रेड अलर्ट

Share

मुंबई : राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचे आगमन झाले असून मुंबईसह गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह पश्चिम किनारपट्टी आणि मध्य महराष्ट्र, विदर्भामध्ये पावसाची कोसळधार सुरूच आहे.

काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने या आठवड्यात गणरायासोबत आगमन करीत मुंबईकरांना झोडपले. दरम्यान मध्यंतरी विसावा घेत आज पुन्हा मुंबईत पावसाचा कहर दिसून येत आहे. चेंबूर, मानखुर्द, हिंदमाता, सायन गोवंडी या परिसरात पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान मुंबईत पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील मंदावली असून अनेक सखल भागात पाणी भरायला सुरूवात झाली आहे.

तसेच गडचिरोलीत होत असलेल्या दमदार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील काही तासांपासून बरसणार्‍या तुफान पावसामुळे सध्या पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या पश्चिम किनारपट्टी लगतच्या शहरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूरातही पुन्हा पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. पुरामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी आपत्कालीन स्थितीमध्ये १०० या क्रमांकावर मदत मागण्याचं आवाहन केलं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!