Type to search

देश विदेश

गुजरातमध्ये लवकरच जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान

Share

मुंबई : जगातील सर्वात मोठे स्टेडीयम म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न येथील क्रिकेट स्टेडियम कडे पहिले जाते. परंतु लवकरच मेलबर्न क्रिकेट स्टेडियम दुसऱ्या क्रमांकावर जाणार असून पहिल्या क्रमांकावर गुजरात मधील स्टेडियम असणार आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडीयम उभारणीचे काम वेगाने सुरु असून स्टॅच्यु ऑफ युनिटी नंतर गुजरातचा शिरपेचात हा दुसरा तुरा खोवला जाणार आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाथवाणी यांनी या स्टेडीयम बांधकामाचे काही फोटो त्यांच्या ट्विटर अकौंटवर शेअर केले आहेत. या स्टेडियमसाठी ७०० कोटी खर्च केले जात आहेत. यात १.१० लाख प्रेक्षक बसू शकणार आहेत.

६३ एकरात पसारा असलेल्या या स्टेडीयममध्ये ३ सराव मैदाने, क्लब हाउस, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, इनडोअर क्रिकेट अकादमी असून येथे ३ हजार चारचाकी तर १० हजार दुचाकी वाहने पार्क करण्याची सुविधा आहे. २०१७ मध्ये या स्टेडीयमचे काम सुरु झाले असून ते वेगाने पूर्ण केले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!