भूमिपुत्रांना रोजगारासाठी विशेष कायदा आणणार – राज्यपाल

भूमिपुत्रांना रोजगारासाठी विशेष कायदा आणणार – राज्यपाल

मुंबई : ‘भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आरक्षणााचा विशेष कायदा आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेत दिले. तसेच अवकाळी पावसामुळे आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीस आर्थिक साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. महत्वाचे म्हणजे राज्यपालांनी मराठीतून अभिभाषण केले.

ते विधानसभेत सुरु असलेल्या विशेष अधिवेशना दरम्यान बोलत होते. सकाळच्या सुमारास विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर संध्याकाळी ०४ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण केले.

ते यावेळी म्हणाले कि बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करुन देणारा असून भूमिपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करणार आहोत, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी अभिभाषणात सांगितले. मुख्यमंत्री रस्ते निर्माण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, अल्पदरात वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालये महाविद्यालये देखील निर्माण केले जातील असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com