Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा होणार पण अटी लागू

Share

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू होणार असून यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, परंतु यासाठी काही अटी लागू असणार आहेत.

दरम्यान राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल आणि सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी ३१ डिसेंबरपर्यंत करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

परंतु यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना काही अटींना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये सध्या साडे सात तास काम करत असून यामध्ये अधिकचा अर्धा तास समाविष्ट केला तर कर्मचारी दररोज ८ तास काम करतील, राजपत्रित अधिकारी महासंघाने निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले कि, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा केला जाईल. त्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये निर्णय घेतला जाईल. यानंतर जानेवारी २०२० पासून हा निर्णय लागू करण्यात येईल. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ही अट मान्य करावी लागणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!