Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

भाजपला ७२ तर शिवसेनेला २४ तासांची मुदत का? संजय राऊत यांचा सवाल

Share

मुंबई :राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न होत आहेत, पण आम्ही राज्यात स्थिर सरकार आणू, असे आश्वासन संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

दरम्यान भाजपच्या सत्ता स्थापनेच्या नकारानंतर आज शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले कि, राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली, मात्र शिवसेनेला फक्त २४ तासांची मुदत दिली, असं का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आम्हाला कमी वेळ देऊन राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न होत आहेत, बहुमत सिद्ध कर्णयसाठी पुरेसा कालावधी आवश्यक असतो, तो शिवसेनेला कमी दिला जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले कि, विधानसभेच्यावेळी ठरल्याप्रमाणे भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचं नाकारलं. हे अहंकारच लक्षण असून जेव्हा युती ठरली होती तेव्हा काय ठरलं होत आणि आता काय म्हणताय, यामुळे भाजपने शिवसेनेला दोषी ठरवू नये, अशी त्यांनी सांगितले. सरकार बनवणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्याला स्थिर सरकार मिळाव, यासाठी प्रयत्नशील असलयाचे ते यावेळी बोलले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!