Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

उद्या शरद पवार सोनिया गांधींना भेटणार; सरकार स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता

Share

मुंबई : महाशिवआघाडी आज राज्यपालांची भेट घेणार असल्याने राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना भेटून सरकार स्थापनेबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यासह बैठक होत असून शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक महत्वाची ठरणार आहे. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेला गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दि. १५ रोजी तिन्ही पक्षांच्या बैठकीला किमान सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान सामायिक कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असून तो तिन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, आज तिन्ही पक्षांतील नेते राज्यपालांना राजभवनावर भेटायला जाण्याची शक्यता आहे.

एका वृत्तानुसार सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात तीन दिवस सलग बैठका होणार आहेत. १७, १८ आणि १९ नोव्हेंबर या तीन दिवस दिल्लीत वरिष्ठ नेत्यासंह बैठका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!