फ्लिपकार्ट आता जुन्या वस्तूही विकणार

0

मुंबई : ओएलक्स व राज्याप्रमाणे वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, त्याचप्रमाणे आता देशातील सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टने देखील ‘टू गुड’ या वेबसाईटच्या माध्यमातून जुन्या सामानाची विक्री करणार आहे. यासंदर्भात कंपनीने नुकतीच घोषणा केली असून या वेबसाइटवर सुरूवातीला जुने इलेक्ट्रिक सामान विकले जाणार आहे. कंपनी या सोबत गुणवत्तेचे सर्टिफिकेट देखील देणार आहे.

सध्या या स्टोरमध्ये जुने मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट सारख्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. यातील वस्तू या कमी दरात दिल्या जाणार आहेत. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, फ्लिपकार्टच्या या नव्या स्टोरमध्ये येणाऱ्या काही दिवसांत स्पीकर, पावर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि त्यासारखे ४०० हून अधिक प्रोडक्ट उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे अधिकधिक ग्राहक या कंपनीकडे आकर्षित होणार असल्याची चर्चा आहे. या नव्या संकेतस्थळाला छोट्या शहरांकडून अधिक आशा आहेत. त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा त्यांचा विचार आहे.

LEAVE A REPLY

*