Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

LIVE अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला आग, एकाचा मृत्यू

Share
मुंबई : अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागली असून बचाव कार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात किमान १५ रुग्ण अडकले असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळच्या पालिका व खासगी रुग्णालयांना सतर्क करण्यात आलं आहे.
अंधेरी मरोळ भागात तळ अधिक पाच मजल्यांचं  कामगार रुग्णालय असून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. आगीबाबत पावणेपाचच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने १०बंब, रेस्क्यू व्हॅन व अन्य सामग्रीसह अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!