Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबईतील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग; १०० जण अडकल्याची भीती

Share

मुंबई : मुंबईमधील वांद्रे भागात एमटीएनएल इमारतीला आग लागली असून १०० जण अडकल्याची माहिती मिळत आहे. ही घटना दुपारी ३.१५ च्या वाजताच्या सुमारास घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान आग विझवण्याचे व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान ही आग इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली असल्याने इमारतीच्या गच्चीवर अनेकजणअडकून पडले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने या आगीत जीवित आणि वित्तहानीचं कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

इमारतीच्या वरील मजल्यावर आग लागल्याने आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी वस्ती, झोपडपट्ट्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!