‘आशा’ स्वयंसेविकांची कामे, मिळणारा निधी ऑनलाईन करा : अर्थमंत्री मुनगंटीवार

0

मुंबई : राज्यात ग्रामीण भागात ६० तर शहरी भागात १० हजार अशा ७० हजार आशा स्वयंसेविका काम करतात. या सर्व स्वयंसेविकांची कामे, त्याबद्दल त्यांना देण्यात येणारी रक्कम, त्यांना दिले जाणारे लाभ अशी त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती आरोग्य विभागाने ऑनलाईन उपलब्ध करावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

‘आशा’ व गट प्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी, आरोग्य संचालक आणि विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

आशा स्वयंसेविकांना ७३ कामांसाठी परफॉर्मंन्स बेस रक्कम प्रदान केली जाते या रकमेत केंद्र शासनाने २००७ पासून वाढ केलेली नाही. त्यात वाढ करण्यात यावी यासाठी आपण, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी पंधरा दिवसात भेटणार असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, इतर राज्यांमध्ये आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामांसाठी कशा प्रकारे रकमेचे प्रदान केले जाते, त्यांची पद्धती काय आहे तसेच त्याचे परिणाम कशा स्वरूपात दिसून आले आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत, याचा विभागाने परिपूर्ण अभ्यास करावा. आशा स्वयंसेविकांना फिक्स रक्कम द्यायची की कामावर आधारित रकमेमध्ये वाढ करायची, असे झाल्यास काय परिणाम होऊ शकतात,हे ही विभागाने अभ्यासावे. विभागाने आशा स्वयंसेविकांचे प्रश्न समजून घ्यावेत,त्यांना अत्याधुनिक स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही  मुनगंटीवार यांनी केल्या.

LEAVE A REPLY

*