Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

अवघ्या चार दिवसांत फडणवीस सरकार कोसळले; मुख्यमंत्र्याचाही राजीनामा

Share

मुंबई : ‘सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अजित पवार हे मला भेटले त्यांनी सांगितले कि, मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी हात काढल्यामुळे आम्ही देखील बहुमत सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे मी देखील या पत्रकार परिषदेनंतर राजीनामा देणार आहे’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

दरम्यान सकाळच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ होत आहे. दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले कि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असून यापुढे जो पक्ष सरकार स्थापन करत असेल त्यांना आमच्या शुभेच्छा असून आम्ही चांगल्याप्रकारे विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू.

तसेच ऑटो रिक्षाचे तीन चाके वेगळे झले तर काय अवस्था होते. तशी अवस्था या तीन पक्षांची होणार आहे., असा टोलाही त्यांनी यावेळी महाशिवआघाडीला लगावला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!