Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर आठ दिवसांचा मेगा ब्लॉक; ‘या’ गाड्या असणार बंद

Share

मुंबई : मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. पावसाचा परिणाम वाहतुकीवर होत असल्याने पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान ही वाहतूक २६ जुलै ते ९ ऑगस्ट या काळात बंद असणार आहे.

दरम्यान या वाहतूक बंद असल्याचा फटका सिंहगड एक्स्प्रेस व प्रगती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे १३ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून मुंबईहून सुटणाऱ्या या गाड्या पुण्याहून सोडल्या जातील.

याशिवाय पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसंच भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

‘या’ गाड्या असणार बंद 

१.ट्रेन क्रमांक ११००८ /११००७ पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस

२. ट्रेन क्रमांक १२१२६ /१२१२५ पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस,

३. ट्रेन क्रमांक १११३९ सीएसएमटी मुंबई-  गदग एक्स्प्रेस

४.  ट्रेन क्रमांक १११४० गदग एक्स्प्रेस- सीएसएमटी मुंबई

५. ट्रेन क्रमांक ५१३१८/ ५१३१७ पुणे-पनवेल-पुणे 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!