Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

डोंगरी इमारत दुर्घटना; मृताच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत

Share

मुंबई | प्रतिनिधी 

डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. थोड्याच वेळेपूर्वी ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे.

काल १०० वर्षे जुनी असलेली डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता. अजूनही याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे.

सरकारकडून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत, तसेच सर्व वैद्यकीय खर्च देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!