गणेशोत्सवादरम्यान डॉल्बी वाजणार नाही : उच्च न्यायालय

0

मुंबई : बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आता बाप्पांच्या उत्सवात सर्वजण डांग झाले आहेत. यातच ठिकठिकाणी डॉल्बी वाजविण्यावर भर दिला जाणार आहे, परंतु डीजे आणि डॉल्बीच्या वापराला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात न्यायालयाने राज्य शासनाला डॉल्बी आणि डीजेच्या वापरावर सरसकट बंदी घालावी का म्हणून आपला पक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवात पारंपरिक वाद्ये अधिक वाजवली जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आजच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर बोलताना म्हटले, की सणवार हे दरवर्षी एका मागून एक येतच राहणार. मात्र डीजे-डॉल्बीच्या माध्यमातून नागरिकांना होणारा त्रास, ध्वनी प्रदूषण आणि डेसिबल मर्यादेचे उल्लंघन याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

डॉल्बी आणि डीजे यांच्यावर सरसकट बंदी घालणे कितपत योग्य असून या बद्दल राज्य शासनास काय वाटते हे जाणून घेण्यासाठी येत्या १९ सप्टेंबरला राज्य शासनास न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*