Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

ऐन दिवाळीत बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता

Share

मुंबई : दिवाळीचा सण तोडांवर येऊन ठेपला असतांना मुंबईची लाईफलाईन बेस्ट बसचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. येत्या १७ ऑक्टोबरला कामगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये संपाची निर्णय घेतला जाणार आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने याबाबत पाऊल उचलण्यास सुरवातही केली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. यातील काही मागण्या मेनी झाल्यानंतरसंपाला तूर्तास स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता ऐन दिवाळीत बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वेतन कराराच्या प्रतीक्षेत असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबरपासून संपाचा इशारा दिला होता, मात्र प्रलंबित मागण्या आणि नियम १३ रद्द करावा, याप्रकरणी औद्योगिक आणि कामगार न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे हा संप रद्द करून १७ ऑक्टोबरला संपाचा निर्णय जाहीर करु, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!