फडणवीसांना बहुमतासाठी ३० तासांची मुदत; मतदानाचे लाइव्ह प्रक्षेपण करा : सुप्रीम कोर्ट
Share

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला सुरवात झाली असून देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३०तासांची मुदत देण्यात आली आहे. उद्या सांयकाळी पाच वाजेपर्यंत मुदत बहुमत सिद्ध करावा लागणार आहे.
दरम्यान राज्यातील हायहोल्टेज ड्रम सुप्रीम कोर्टात गेला असून आज तिसरा दिवस सुनावणीचा होता. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असून उद्या पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यामध्ये हंगामी आणि स्थायी सदस्यांची नियुक्ती करावी तसेच गुप्त मतदान न करता लाइव्ह प्रक्षेपण करा, म्हणजेच मतदान चिठ्ठीद्वारेच होईल पण गुप्त नसेल असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीस तास असून २७ नोव्हेंबर च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल अन्यथा सरकार स्थापन करता येणार नसल्याची माहिती मिळते आहे.