मुख्यमंत्र्यांची पहिली सही वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धनादेशावर
Share

मुंबई : शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री सह्हाय्यता निधीतून कुसुम वेंगूळकर यांना निधीचा चेक देण्यात आलं आहे. यावर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच या निधीच्या धनादेशावर देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे.
दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अजून सुटला नाही. त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने गरीबांची आशा असलेल्या मुख्यमंत्री मदत कक्षाला कुलूप लावण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २२) सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत वैद्यकीय सहायता निधी सुरु ठेवावा याबाबत चर्चा केली होती.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारत पहिल्यांदाच कुसुम वेंगूळकर याना वैद्यकीय सहायता निधीतून धनादेशाचे वाटप केले.