Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

…म्हणून फडणवीस झाले ‘महाराष्ट्र सेवक’

Share

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरील सीएम काढून महाराष्ट्र सेवक असे केले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेचा कार्यकाळ ०९ नोव्हेंबरला संपला असून त्यांनी यादिवशी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून जो पक्ष आता सत्ता स्थापनेचा दावा करेल त्यांचा मुख्यमंत्री होईल. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कारभार पाहण्यास सांगितले. पण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्रीपदही फडणवीस यांच्याकडे राहिले नसल्यामुळे त्यांनी आपले सोशल मीडियावरचे अकाऊंटही रिनेम केले आहे.

ट्विटवरचे CM Devendra Fadnavis हे अकाऊंट रिनेम करत आता फक्त Devendra Fadnavis असे केले आहे. तसेच त्यांनी स्वत:ला ‘महाराष्ट्र सेवक’ म्हणून संबोधित केले आहे. त्यांनी ट्विटरचे कव्हर पेजही बदलून ‘धन्यवाद महाराष्ट्र’ असे म्हणत राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.

सीएमओ महाराष्ट्र (CMO Maharashtra) या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला असून या अकाऊंटचा कव्हर फोटो मात्र देवेंद्र फडणवीस यांचाच ठेवण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!