देवजित सरकार संकटात; जयंत पाटील यांनाच व्हिप बजावण्याचा अधिकार
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना अधिकृतपणे व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याची नोंद समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार यांना व्हिप बाजवता येणार नाही, अशी शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांची अधिकृत नोंद झाल्याची माहिती आहे.
दरम्यान विधानसभेच्या निकालानंतर ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर शनिवारी अचानक अजित पवार यांनी बंडखोरी करता भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकारला उद्या पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिल्याने आता व्हीप बजावण्याची अधिकार अजित पवार यांना नसल्याने देवेंद्र सरकार संकटात सापडले आहे. कारण विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
या बंडखोरीनंतर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.